सिंधुदुर्ग : सावडाव धबधबा प्रवाहित, पर्यटकांची तुफान गर्दी | पुढारी

सिंधुदुर्ग : सावडाव धबधबा प्रवाहित, पर्यटकांची तुफान गर्दी

सिंधुदुर्ग : सचिन राणे (सावडाव) : अल्पावधीत महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. यावर्षी पुन्हा एकदा वर्षा पर्यटन सुरू होणार असून जिल्ह्यासह राज्य व परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी होणार आहे. मान्सून उशिया सक्रिय झाला तरी सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणा-या पाऊसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनांसाठी सावडावकडे येत्या शनिवार, रविवार व विकेंडला वर्षा पर्यटकांची पाऊले वळू लागणार असून हिरवीगर्द झाडी,हिरव्या गार निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळणार आहे.

मान्सून पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अशी चिन्ह असताना जून अखेर एकदाचा दमदार पाऊस सुरु झाल्यावर जिल्हातील अनेक धबधबे प्रवाहीत झाले. जिल्हातील आंबोली नतंर दुस-या स्थानाचे सूरक्षित धबधबा म्हणून वर्षा पर्यटनासाठी जिल्हयासह राज्यातून व इतर राज्यातील अनेक पर्यटक मोठया संख्येने वर्षा पर्यटनासाठी सावडावला येत पसंती देतात. डोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळून लागला असल्याने धबधब्याखाली अनेक पर्यटक आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावर्षी जून अखेरपासून ते सप्टेंबर काळात सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढणार असून रविवार व सुटटीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी वाढणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावरुन शासनाच्या निधीतून सावडाव परीसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता,रस्ते अशा प्रकारची कामे करण्यात आली असून पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यटकांची गर्दी पाहता सावडाव येथे बारमाही पर्यटन होण्याबरोबरच पर्यटनात्मक विकास करून सावडाव परीसाराचा विकास व रोजगाराभिमूख संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी गांर्भीयांने लक्ष देण्याची गरज आहेसध्या लोखंडी रॅम्प,पाय-या, शुशोभिकरण,बाधरूम, टॉयलेट अशा प्रकारे पयाभुत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिकांनी दुकाने मांडून पर्यटकांची सोय केली असल्याने थोडयाफार प्रमाणात का होईना रोजगार उपलब्ध झाला झाला आहे. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या सोयी अपू-या पडत असून त्या दर्जेदार होण्याची गरज आहे. सावडाव धबधबा ठिकाणी सर्व पर्यटकांनी येताना दरवर्षी प्रमाणे आनंद लुटावा व सहकार्य करावे असे आवाहन सरपंच आर्या वारंग व उपसरंच दत्ता काटे यानी केले.

हेही वाचा

Back to top button