Prof. G.D.Yadav : मराठी माणसाचा अमेरिकेत डंका; प्रा. जी.डी. यादव आंतरराष्ट्रीय फेलोशीपने सन्मानीत

Prof. G.D.Yadav : मराठी माणसाचा अमेरिकेत डंका; प्रा. जी.डी. यादव आंतरराष्ट्रीय फेलोशीपने सन्मानीत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानस्पद गोष्ट घडली आहे. भारत सरकारचे राष्ट्रीय विज्ञानचे अध्यक्ष प्रा. गणपती यादव (Prof. G.D.Yadav) यांना आंतरराष्ट्रीय फेलोशीप देऊन सन्मान करण्यात आला आहे. ही मराठी जनतेसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. इन्स्टिटूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबईचे माजी कुलगुरु प्रा. गणपती यादव यांना यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स (INA) चे फेलो म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे. वॉशिंग्टन डीसी येथे २७ जून रोजी हा सन्मान करण्यात आला.

NAI USA या फेलोशिपने सन्मानित होणारे प्रा. यादव हे इतिहासातील दुसरे भारतीय व्यक्ती ठरले आहेत. एनएआयच्या वार्षिक अधिवेशनात त्यानी मुख्य वक्ते म्हणून "Net Zero Goal and Sustainability: Green Hydrogen Technologies, carbon dioxide refineries, biomass valorisation and waste plastic recycling या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्याचे प्रचंड कौतुक झाले. (Prof. G.D.Yadav)

NAI ची स्थापना यू.एस. पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून पेटंट्ससह शोधकांना ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शैक्षणिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची दृश्यमानता वाढवण्यासाठी, बौद्धिक संपत्तीच्या प्रकटीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षित आणि मार्गदर्शन करण्यासाठी आणि सदस्यांच्या आविष्कारांचे भाषांतर करण्यासाठी करण्यात आली होती. या गोष्टीचा समाजाला मोठा फायदा होतो आहे.(Prof. G.D.Yadav)

या वर्षी निवडून आलेल्या फेलोकडे १७७१ यूएस पेटंट आहेत. प्रा. यादव हे १२१ पेटंट्सचे शोधक आहेत. त्यांचे अलीकडील काम एका डॉलरपेक्षा कमी खर्चात पाण्याचे विभाजन करून ग्रीन हायड्रोजन निर्मिती, कार्बन डायआॅक्साईड पासून मिथेनॉल, डायमिथाइल इथर, मिथेन आणि उच्च हायड्रोकार्बन्स आणि बायोमस कचरा यांसारख्या रसायनांमध्ये मूल्यीकरण. टाकाऊ प्लॅस्टिक कचरा पासून १४ विविध मूल्यवर्धित रसायनांनी निर्मिती यातील मूलभूत संशोधन व तंत्रनिर्मिती यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यूएस पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयात शोधकांच्या नावांसह एक फलक स्थापित करण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. यादवांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रीन हायड्रोजन उत्पादनावरील त्यांच्या कामाला ओएनजीसी एनर्जी सेंटरचे समर्थन आहे आणि गोव्यात एक पायलट प्लांट उभारला जात आहे.
डॉ. यादव यांना नागार्जुन पुरस्कार जाहीर

गेल्या आठवड्यात हिंदू रिसर्च फाऊंडेशनने दुसरा नागार्जुन पुरस्कार डॉ. गणपती यादव यांना जाहीर केला. सन्मानचिन्हासह १ लाख रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूरमध्ये या पुरस्कारचे वितरण सोहळा संपन्न होणार आहे. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. यादव यांना १२५ हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्यांची आयआयटी गुवाहाटी येथे बायोटेक रिसर्च सोसायटी इंडिया (BRSI) चे मानद फेलो म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. MIT ADT विद्यापीठाने त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचा पहिला भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मान केला होता. २.५ लाख रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. २ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांना वॉशिंग्टनमधील यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये समाविष्ट करण्यात आले. अकादमीच्या संपूर्ण इतिहासात केवळ २३ भारतीय नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. १०९ पीएच.डी., १४२ मास्टर्स आणि ४८ पोस्ट-डॉक्टरेट, ५५३ मूळ पेपर्स आणि जगभरात ९५० व्याख्यानांसह मार्गदर्शन करण्याचा अनोखा विक्रमही प्राध्यापक यादव यांच्या नावावर आहे.

त्यांनी IOCL च्या सहाय्याने भुवनेश्वर आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने जालना येथे दोन नवीन कॅम्पस स्थापन केले. केंद्र सरकारच्या अनेक समित्या आणि धोरण निर्मात्या संस्थांवर ते कार्यरत आहेत. ते ६ नामांकित कंपन्यांचे स्वतंत्र संचालक आणि ४ दशकांपासून उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य करीत आहेत.

ते सर्व भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी अकादमी आणि द वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इतर अनेक व्यावसायिक संस्थांचे निवडून आलेले फेलो आहेत. ते सध्या महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष आहेत. इंडियन केमिकल सोसायटी आणि एसीएस इंडिया इंटरनॅशनल चॅप्टरचे अध्यक्ष आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news