राजापूर : पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून, दुकानांचे नुकसान | पुढारी

राजापूर : पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून, दुकानांचे नुकसान

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुका आणि शहर परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजापूर परिसरात रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे. काल रात्री उशीरा जवाहर चौकामध्ये धडक देणार्‍या पुराच्या पाण्याने आज सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे.

अधिक वाचा : 

जवाहर चौकात पुराच्या पाणी

जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासाहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. सतंतधार पावसाने पुरस्थितीमध्ये वाढ होत आहे. शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. वाढत्या पुराच्या पाण्याने व्यापार्‍यांची मात्र, त्रेधातिरपीट उडविली आहे.

राजापूर तालुका तहसीलदार प्रतिभा वराळे म्हणाल्या की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून आज सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एकजण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.

अधिक वाचा : 

नद्याना पूराचे पाणी आल्याने पात्राबाहेर

दरम्यान तालुक्यातील जवळच्या सर्व गावांत कोणी मिसिंग असल्यास तत्काळ माहिती पोलिस स्टेशनवर द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्‍यांदा शहराला वेढा घातला आहे.

शहरातील बंदरधक्का, मुंशीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पूराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसिलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पुरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्‍यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.

गेले दोन दिवस तालुक्यामध्ये सततधारा पाऊस पडत आहे.

अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन शहरामध्ये पूर आला.

शहरातील शिवाजीपथ रस्त्यासह बंदरधक्का, मुन्शी नाका, वरचीपेठ परिसरासह कोदवली नदीच्या काठावरील टपर्‍या काल सायंकाळी पाण्याखाली गेल्या आहेत.

रात्री पूराच्या वाढलेल्या पाण्याने शहराला वेढा घातल्याने जवाहर चौकाचा संपर्क तुटला आहे. त्यामध्ये सुमारे अडीच ते तीन फूट उंचीचे पाणी जवाहर चौकात साठले आहे.

नदीच्या पलिकडील लोकवस्तीचा शहरातील अलीकडील लोकवस्तीशी संपर्क तुटला.

शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. पूराच्या पाण्याचा वेग आणि पातळी सातत्याने वाढत असल्याने व्यापार्‍यांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरूवात केली आहे. शहरानजीकच्या शीळ, गोठणेदोनिवडे, उन्हाळे, दोनिवडे, चिखलगाव, पन्हळेतर्फ राजापूर, गोवळ, शिवणे आदी गावांमधील भातशेती आणि गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हे ही वाचा :

हे ही पाहा :

महात्म्या फुल्यांचे अनेक सहकारी वारकरी होते…

Back to top button