हतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, १६ दरवाजे उघडले | पुढारी

हतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, १६ दरवाजे उघडले

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. हतनूर धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर तापी नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कोणीही नदीपात्रात जावू नये असा जिल्हा प्रशासनाने इशारा दिला आहे.

अधिक वाचा : 

तापी व पूर्णा नदीच्या उगम स्थानावर होणाऱ्या पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. तापी नदीपात्रात ४५८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू वाढल्याने प्रसाशनाने नदीपात्रात न जाण्याचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याचबरोबर नागरिकांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा : 

धरणाची पाणी पातळी 209.800  मीटर आहे तर ग्रॉस स्टोरेज 189.00 मि. मी आहे. धरणात ग्रॉसस्टोरेज 48.71 टक्के आहे. सध्या डिस्चार्ज 45803 क्यूमॅक्स विसर्ग सुरू आहे. गेल्या 23 तासांत हतनूर धरणाच्या परिसरात 29.86 मि. मी. पाऊस झाला आहे

पुढील 24 तासांत पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा : 

हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; नंदुरबार जिल्ह्यात अलर्ट

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. आज १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

येत्या काही तासांत नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता द्वार परिचालन करण्यात येईल व नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येईल.

पुढील २४ ते ४८ तासांत पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा :

हे ही पाहा :

Back to top button