पुणे : राजकीय गुरू रघुनाथ येंमुल याला अटक | पुढारी

पुणे : राजकीय गुरू रघुनाथ येंमुल याला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील रघुनाथ राजराम येंमुल या बड्या राजकीय गुरूला एका प्रकरणात चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी अटक केली. रघुनाथ राजराम येंमुल (48, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) यांच्या अटकेने पुण्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके देत, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणार्या उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणाच्या आरोपाची संबंधीत असलेल्या उच्चभ्रू अध्यात्मिक गुरू  रघुनाथ राजराम येंमुल यास चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी अटक केली.

अधिक वाचा :

रघुनाथ राजराम येंमुल सह या प्रकरणात पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय 36) यांच्यासह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून पती गणेश आणि राजु अंकुश हे फरार झाले आहेत. याबाबत 27 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

अधिक वाचा :

रघुनाथ येंमुल
रघुनाथ येंमुल

रघुनाथ येमुल यांनी पती गणेश गायकवाड यांना फिर्यदी अवदसा असुन पांढर्‍या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दुषीत झाले आहेत.

जर तुझी ही बायको म्हणु अशी कायम राहीली तर तु आमदार होणार नाही व मंत्री होणार नाहीस त्यामुळै तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्या काढुन घे, मी देतो ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडी कायमची निघुन जाईल, त्यानंतर पती गणेश यांनी फिर्यादीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला.

 

 

अधिक वाचा :

संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबत फिर्यादीने नमूद केल्यानंतर ल्यानंतर येमुल गुरूजींना अटक करण्यात आली.

गुरूजींचे वरिष्ठ अधिकार्‍यांशी स्नेह

येमुल गुरूजींचे राजकीय पासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी स्नेह आहे. आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्यांचे भक्त त्यांना भेटता येईल का ? यासाठी येरझर्‍या मारत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील पती असलेल्या संशयीत आरेापीला येमुल गुरूजीने पत्नीचे पायगुण चांगले नसल्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर फिर्यादीचा कौटुंबिक छळ झाला. दरम्यान, येमुल गुरूजींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर त्यांना अटक झाली आहे.
– पंकज देशमुख, उपायुक्त.

हे ही वाचले का?

पहा फोटो : विबंलडन विजेती ॲश्ले बार्टी

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button