मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे ठाकरे सरकार सरसकट मागे घेणार | पुढारी

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे ठाकरे सरकार सरसकट मागे घेणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठा समाजाला ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मराठा आंदोलनामध्ये दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा आहे.

सरकारच्या या निर्णयासाठी मराठा आरक्षणासाठी निर्णायक एल्गार पुकारलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आभार मानले आहेत.

अधिक वाचा

निलेश राणे : ‘शरद पवारांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला’

काॅंग्रेस : “मी स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहे”, नाना पटोलेंचं वक्तव्य

मराठा मोर्चे पूर्णत: शांततेत निघाले, पण काही ठिकाणी मोर्चाला गालबोठ लागले होते. त्यामुळे संबंधित आंदोलकांवर पोलीसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत अनेक नेत्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली होती.

अधिक वाचा

पद्म पुरस्कारासाठी नामांकने देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

समान नागरी कायदा हा केंद्राचा विषय, शरद पवार यांचे भाष्य

याबाबतीत तत्कालिन गृहमंत्र्यांकडेही मागणी केली होती. आता या मागणीला यश आले असून गुन्हे मागे घेतले आहेत.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही गुन्हे मागे घेण्याची मागणी करत या प्रकरणाला वाचा फोडली होती. आव्हाड यांनी ट्विट करून गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांना विनंती केली होती.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

धनंजय मुंडे यांनी देखील हीच मागणी लावून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन दिले होते.

हे ही वाचलं का?

भाजप : Google वर जाहिरातीत भाजपचा कॉंग्रेसपेक्षा सहा पट अधिक खर्च

Twitter ने अखेर तक्रार अधिकारी नेमला; नव्या आयटी मंत्र्यांच्या इशाऱ्याने तीन दिवसात उपरती!

पाहा :  क्रिकेटर ॲश्ले बार्टी कशी विंबल्डन चॅम्पियन? (photos)

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button