भुईबावडा घाट : भूसख्खलन होण्याची भीती, दुरुस्तीची मागणी | पुढारी

भुईबावडा घाट : भूसख्खलन होण्याची भीती, दुरुस्तीची मागणी

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : भुईबावडा घाट मार्गाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. भुईबावडा घाटातील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यामुळे या घाटमार्गातील वाहातूकही ठप्प झाली आहे.

करुळ घाटमार्गही बंद असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोल्हापूरशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.

तालुक्यात गेले काही दिवस अतिवृष्टी सुरु आहे.या अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात रिंगेवाडी पासून सुमारे ५ कि.मी.अंतरावर घाटमार्गात दोन वर्षापूर्वी पडलेली भेग अधिक रुंद होऊन या ठिकाणी रस्ता अधिकच खचत चालला आहे.

अधिक वाचा :

त्यामुळे याठिकाणी भूसख्खलन होण्याची भिती निर्माण झाली आहे.एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे.सुमारे १२० ते १३० मिटर लांब रस्त्याच्या मधोमध ही भेग आहे. त्यामुळे रस्ता केव्हाही खचण्याची शक्यता आहे.

भुईबावडा घाट मार्गात पावसाला सुरुवात झाल्यापासून घाटात वारंवार दरड कोसळत आहे.

करुळ घाट खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.

अवजड वाहतुकीमुळे भुईबावडा घाट ठिकठिकाणी खचत चालला होता. हा धोका लक्षात घेऊन या मार्गावरील अवजड वाहतूक दिनांक २२ जुलैपासून बंद करण्यात आहे. तर प्रवाशी वाहातूक सुरु होती.

मात्र घाटमार्गात पडलेल्या भेगामुळे कधीही रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या घाटमार्गातील वाहतुकही पूर्णपणे बंद करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.

अधिक वाचा :

त्यामुळे जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणारे हे दोन्हीही घाटमार्ग बंद झाल्यामूळे जिल्ह्याचा कोल्हापूर जिल्ह्याशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.

दरम्यान करुळ घाटमार्गातील दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करुन करुळ घाटमार्गातील वाहातूक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु करावी.अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

Back to top button