राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा उघडला, ८,५९४ क्युसेक्स विसर्ग | पुढारी

राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा उघडला, ८,५९४ क्युसेक्स विसर्ग

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान, काल रात्री ११ वाजता राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा उघडला. तसेच, धरणातून ८,५९४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण २८२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेट क्रं. ३,४,५,६,७ प्रत्येक द्वारातून १,४२८ क्युसेक्स प्रमाणे एकूण ७,१४० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

दरम्यान रविवारी (दि. २५) दुपारी राधानगरी धरण पूर्ण भरले. रविवारी सायंकाळी सातवाजेपर्यंत धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार खुले झाले होते. यात ३, ४, ५, ६ क्रमांकाच्या दरवाजांचा समावेश होता.

राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चार-पाच दिवस कोल्हापूर शहर व जिल्ह्यात हाहाकार माजवलेल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पण अजूनही काही भागात पुराचा वेढा कायम आहे.

जिल्ह्यातील ३६६ गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पंचगंगा नदीने विक्रमी ५६ फूट तीन इंच पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर जलमय बनले आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सकाळी दहानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

तावडे हॉटेल ते सांगली फाटा या दरम्यानच्या महामार्गावर अजूनही दीड फूट पाण्याची पातळी आहे.

राधानगरी धरण

धरण माथा पातळी- (TBL)– ३५२ फूट
पूर पातळी- (MWL) — ३४८.४३ फूट
पूर्ण संचय पातळी-( FSL)– ३४७.५०फूट
प्रकल्पीय एकूण पाणी साठा–८३६२.१६दलघफू (८.३६ टी.एम.सी.)
उपयुक्त पाणी साठा–७७६८.१६ दलघफू (७.७७ टी.एम.सी.)
मृत पाणी साठा —५९४ दलघफू (०.५९ टी.एम.सी.)

आजची स्थिती

(सकाळी ६.००)
दैनिक पाऊस–१२२ मिमी
‌एकूण पाऊस–२८२० मिमी
पाणी पातळी –३४६.७९ फूट
पाणी साठा–८३१७.६३ दलघफू
(८.३१ टि.एम.सी.) १०० टक्के
विसर्ग.
१) गेट क्रं. ३,४,५,६,७ प्रत्येक द्वारातून १४२८ क्युसेक्स प्रमाणे ७१४० क्युसेक्स
१) बी.ओ.टी.पाॅवर हाऊस–१४००क्युसेक्स
एकूण विसर्ग——८५४० क्युसेक्स

आज सकाळी ९ वाजता पाणी पातळी ३४७.०४ फूट आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

 

Back to top button