प्लास्टिक बंदी : मनपा अ‍ॅक्शन मोडमध्ये..! | पुढारी

प्लास्टिक बंदी : मनपा अ‍ॅक्शन मोडमध्ये..!

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिक वापरावर एक जुलै 2022 पासून संपूर्ण बंदी घालण्यात आली असून, 1 जुलैपासून महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या 13 पथकांकडून कारवाई करण्यास सुरू करण्यात आली असून, गेल्या दोन दिवसांत शहरातील शहागंज, रेल्वे स्टेशन, शाहनूरमियाँ दर्गा चौक, हर्सूल मंडई, गजाजन महाराज मंदिर, टाऊन हॉल परिसरात पथकांकडून कारवाई करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंचा वापर आणि कचरा यांवर दंड आकारण्यात येणार असून, यासाठी औरंगाबाद महापालिकेने 13 पथकांची स्थापना केली आहे. या पथकाने कारवाईच्या पहिल्याच दिवशी 343 हातगाड्या, दुकानांची तपासणी केली, यामध्ये 73 जणांवर कारवाई करण्यात आली असून, एका दिवसात पथकाने 43 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला. पहिल्याच दिवशीच्या कारवाईमध्ये पथकाने 67 किलो प्लास्टिक जप्त केले. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरावर बंदी असताना महापालिकेच्या हद्दीत काही वसाहतींमधील किराणा दुकाने, हातागाड्यांवर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येतो, अशा आस्थापनांवर आता महापालिका प्रशासनाची नजर आहे. यासाठी प्रशासनाकडून नुकत्याच 13 नागरिक मित्रपथकांची स्थापना केली असून, या पथकांत प्रत्येकी दोन असे 26 कर्मचारी काम करत आहेत.

प्लास्टिक बंदीसंदर्भात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ—माचे वातावरण आहे. यासंदर्भात औरंगाबाद प्लास्टिक ट्रेडर्स अ‍ॅण्ड असोसिएशनचे सचिव शेख नाजीम म्हणाले की, 23 मार्च 2022 रोजीच्या शासनाच्या अध्यादेशानुसार 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक बॅग, सर्व प्रकारच्या पॅकिंग बॅग मान्य आहेत, नियम व प्लास्टिक बंदीच्या अध्यादेशानुसार प्रतिबंधित प्लास्टिक उत्पादनांटी विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

नागरिकांमध्ये  संभ्रम 

प्लास्टिक बंदीवरून गेल्या काही वर्षांपासून कारवाई सुरू असली, तरी नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत अनेक संभ्रम आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक वॉर्डामध्ये, तसेच प्रभागामध्ये प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांची जनजागृती करण्याची आवश्यकता असून विविध शासन आदेशांमुळे संभ—माची स्थिती निर्माण होते

Back to top button