वैजापुरात चोवीस हजारांचा गुटखा जप्त | पुढारी

वैजापुरात चोवीस हजारांचा गुटखा जप्त

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : गुटख्याची अवैध वाहतूक करणार्‍या एकाला 24 हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई ता.29 रोजी दुपारच्या सुमारास औरंगाबाद येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरातील येवला रोड येथे केली. याप्रकरणी मुजफ्फर फिरोज शहा (रा.दर्गा बेस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजफ्फर शहा हा गुटख्याची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती औरंगाबाद येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाली. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांना येवला रोड येथे मुजफ्फर शहा हा मोटारसायकलव्दारे (एमएच20 एफव्ही4655) गुटख्याची अवैध वाहतूक करत असल्याचे दिसला.
त्याच्याकडून पोलिसांनी 24 हजार 195 रुपये किंमतीचा गुटखा व 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 49 हजार 192 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, ग्रामीण भागात नियमित कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Back to top button