Marathwada : ९ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपुरात | पुढारी

Marathwada : ९ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन अहमदपुरात

अहमदपूर, पुढारी वृत्त सेवा : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कॉम्रेड श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूरच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संस्कृती मंगल कार्यालयात २० व २१ जानेवारी रोजी नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील लेखिका  उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. (Marathwada)

Marathwada : ‘विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा’

या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन व निमंत्रितांचे कविसंमेलन अशी रेलचेल राहणार आहे. २० जानेवारी रोजी शनिवारी सकाळी ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे उ‌द्घाटन सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आहे. संमेलनाध्यक्षा ड.उषा दराडे, ललिता गादगे आदी उपस्थित रा- हणार आहेत. मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील रखी कादंबरी लेखन या विषयावर परिसंवादाच्या अध्यस्थानी सावित्री चिताडे (परभणी) राहणार आहे. या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. जयदेवी पवार, संजीवन नेरकर, द्रौपदी पंदीलबाड, दीपा बियाणी, आसिया चिस्ती इनामदार व शारदा देशमुख यांचा सहभाग असेल. सरोजा देशपांडे (परभणी) यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडणार असून यात अनिता यलमटे, रत्नमाला मोहिते, पुष्पा दाभाडे नलावडे, सुनिता गुंजाळ, अनुपमा बन, डॉ. सत्यशीला तौर सहभागी होणार आहेत. डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न होणार आहे.

रविवार २१ जानेवारी रोजी ‘विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर परिसंवाद दोन चे आयोजन करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. समिता जाधव हे ह्या अध्यक्षस्थानी असतील. विद्या बयास ठाकूर, अनुजा डोईफोडे, शर्मिष्ठा भोसले शैलजा बरुरे, रेखा हाके आणि वैशाली कोटंबे आदी सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप संमेलनाच्या अध्यक्षा ड. उषा दराडे व ड. वर्षा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तथा श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठानच्या प्रमुख ड. ज्योती काळे, सरोजा भोसले, रेखा हाके, आशा रोडगे-तत्तापुरे, संगीता खंडागळे, विमल काळे यांच्या सह संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button