

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना समोर येत आहे. पश्चिम बंगाल येथील स्थानिक लोकांनी त्यांना अपहरणकर्ते समजून त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साधूंना जमावापासून दूर करून जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. (West Bengal)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.11) ही घटना घडली. उत्तर प्रदेशमधील तीन साधू, एक व्यक्ती आणि त्याची दोन मुले स्नान करण्यासाठी गंगासागर येथे जात होते. यावेळी त्यांचा रस्ता चुकला. रस्ता चुकल्याचे लक्षात येताच साधूंनी तेथील मुलींना रस्ता विचारला. परंतु, साधूंना पाहून मुली ओरडत पळत सुटल्या. यामुळे स्थानिक लोकांनी साधूंना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साधूंना काशीपूर पोलीस ठाण्यात नेहले. (West Bengal)
या घटनेबद्दल माहिती देताना पुरुलियाचे पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी म्हणाले, साधूंवर हल्ला करणाऱ्या 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. याशिवाय या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांना शोधण्यासाठी मोहिम सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
साधूंनी मुलींना रस्ता विचारल्यामुळे मुलींना आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. यामुळे स्थानिक लोकांनी साधूंना अपहरणकर्ते समजून मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी साधूंना गंगासागर जत्रेत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.
हेही वाचा :