मराठा संयोजकाची तिसगावला भेट; मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने नियोजनाबाबत चर्चा | पुढारी

मराठा संयोजकाची तिसगावला भेट; मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने नियोजनाबाबत चर्चा

तिसगाव : पुढारी वृत्तसेवा : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई मोर्चा तिसगावमार्गे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीच्या संयोजकांनी तिसगवला भेट देत पाहणी केली. कार्यकर्त्यांशी स्थानिक नियोजनाबाबत चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे यांनी मुंबई येथे पायी मोर्चाने जाऊन उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी ते मुंबई असा त्यांचा पायी प्रवास राहणार असून, या पायी मोर्चामध्ये लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. या प्रवासात त्यांच्या मुक्कामासह नाश्त्याची, जेवणाची नेमकी कुठे व कशी सोय करावी, या अनुषंगाने त्यांच्या संयोजक मंडळीने शुक्रवारी (दि.5) पाहणी दौरा करीत तिसगावला भेट दिली. या संदर्भात दोन दिवसांत नेमके नियोजन केले जाणार आहे.

जरांगे पाटील 20 जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मराठा समाज बांधवांसह मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. त्यांचा प्रवास पाथर्डी नगर रस्त्याने पुढे नगर- पुणे महामार्गाने मुंबई असा असणार आहे. त्यांच्यासोबत लाखो मराठा बंधू भगिनी सहभागी होणार असल्याने, प्रवासादरम्यान, या सर्वांची व्यवस्था कुठे आणि कशी करायची, याच्या नियोजनाबाबत हा धावता दौरा झाला. यावेळी अंतरवाली सराटीचे सरपंच श्रीराम कुरमकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोटे, ज्येेष्ठनेते काशिनाथ पाटील लवांडे, माजी सभापती विष्णूपंत अकोलकर, नगरसेवक महेश बोरुडे, अखिल लवांडे, अंबादास शिंदे, सुनील लवांडे यांच्यासह पाथर्डी, निवडुंगे, तिसगाव, करंजी, दगडवाडी, भोसे, सातवड, मराठवाडी येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button