Nagar : निमोणमध्ये दोन गटांत तुंबळ राडा ; 17 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हे | पुढारी

Nagar : निमोणमध्ये दोन गटांत तुंबळ राडा ; 17 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शाळेत वर्षश्राद्ध घातल्याच्या कारणावरून संगमनेर पंचायत समितीसमोर उपोषण कर ण्याचा इशारा देणारे संगमनेर तालुक्यातील निमोण येथील अशोक वालझाडे व सचिन देशमुख या दोघांना मारहाण करून त्यांना विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न करणारे माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी सदस्यासह 9 जणांविरोधात तर विरोधक जगदंबा माता मंदिरात सुरू असणार्‍या सप्ताहात व्यत्यय यावा म्हणून मारुती मंदिरात लाऊड स्पीकर सुरू करीत कीर्तन बंद पाडणारे निमोणच्या लोकनियुक्त सरपंचासह 8 जणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला. हाणामारीत दोन्ही गटातील 5 जण जखमी झाले.

तालुका पोलिसांनी सांगितले की, पहिल्या घटनेत निमोण गावात जिल्हा परिषदे शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची परवानगी न घेता, शाळा सुरू असताना शाळेत गेल्या आठवड्यात विरोधकांनी वर्षश्रद्ध कार्यक्रम केला. याप्रकरणी चौकशी व्हावी, परवानगी देणार्‍या शिक्षकांवर कारवाई करा, या मागणीसाठी अशोक वालझाडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी गटाच्या काहींनी अशोक वालझाडे, सरपंच संदीप देशमुख यांचे बंधू सचिन देशमुख यांना हनुमान मंदिराजवळ माजी सरपंच व संगमनेर बाजार समितीचे संचालक अनिल, पं. स. माजी सदस्य चंद्रकांत घुगे, सोमनाथ घुगे, शरद घुगे, अनिल घुगे, निलेश विंचु, शेखर घुगे, मनोज मंडलीक व शरद घुगे यांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता गावात हनुमान मंदिराजवळ एकत्र येत अशोक वालझाडे व सचिन देशमुख यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण करीत विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला.

ते दोघे जखमी झाले. त्यांच्यावर लोणी येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निमोणचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी 9 जणांविरोधात विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न करणे, प्राणघातक हल्ला करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुसर्‍या घटनेत निमोण गावात नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा माता मंदिरात सप्ताह सुरू आहे. कीर्तन सुरु होते. यावेळी मारुती मंदिरात लाउड स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणे लावल्याने कीर्तनात व्यत्यय आला. महारजांनी कीर्तन बंद केले. याबाबत जगदंबा माता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष देवराम घुगे व पं. स. माजी सदस्य चंद्रकांत घुगे, धोंडीबा घुगे, शरद घुगे, अनिल घुगे, अनिल घुगे हे सर्वजण शनिवारी रात्री 8 वाजता मारुती मंदिराजवळ गेले.

‘लाऊडस्पीकर का सुरू केला,’ असा प्रश्न सचिन देशमुख, अशोक वाल झाडे, परिमल देशपांडे, संदीप आत्रे, दत्ता वालझाडे, सूरज गायकवाड, संकेत घुगे यांना विचारला. राग अनावर झाल्याने दोन्ही गटांकडून एकमेकांना शिवीगाळ सुरु झाली. अशोक वालझाडे याने अनिल घुगे व चंद्रकांत घुगे या दोघांना बॅटने तर सूरज गायकवाड याने अनिल घुगे यास गजाने मारहाण केली. यानंतर ते निघून गेले. पुन्हा कीर्तन सुरू झाले. यानंतर निमोणचे सरपंच संदीप देशमुख व भाचा सुमित देशमुख कीर्तनाच्या ठिकाणी गेले. चंद्रकांत घुगे, अनिल शिवाजी घुगे, अनिल बबन घुगे, शरद घुगे यास गजाने मार हाण केली. या मारहाणीत चौघे जखमी झाले. त्यांच्यावर संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जगदंबा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवराम घुगे व उपाध्यक्ष साहेबराव मंडलिक या दोघांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देवस्थानचे अध्यक्ष देवराम घुगे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी सचिन देशमुख, अशोक वालझाडे, परीमल देशपांडे, संदीप आत्रे, मधुकर वालझाडे, सूरज गायकवाड, संकेत घुगे, संदीप देशमुख व सुमीत देशमुखविरुद्ध दंगा करणे, शिवीगाळ मारहाण करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पो. नि. देविदास ढुमणे तपास करीत आहेत.

निमोण गावात दुकानदारांनी पाळला कडकडीत बंद
संगमनेर तालुक्यातील निमोण गावात दोन राजकीय पक्षाच्या गटात तुंबळ हाणा मार्‍या झाल्या दोन्ही गटाच्या विरोधात परस्परविरोधी फिर्यादीवरून सतरा जणां च्या विरोधात विविध कलमाने गुन्हेदाखल करण्यात आले आहे त्यामुळे गावातील सर्व व्यापार्‍यांनी आपाली सर्व दुकाने बंद ठेवीत कडकडीत बंद पाळला होता या बंदच्या दरम्यान कुठल्याही अनुचितप्रकार घडू नये म्हणून संगमनेर तालुका पोलि सांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button