शिवसेना-भाजपाचा राहुरी नगरपरिषदेत ठिय्या | पुढारी

शिवसेना-भाजपाचा राहुरी नगरपरिषदेत ठिय्या

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनात शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने ठ्ठिया देत राहुरी शहरातील अडचणीं विषयी पाढा वाचत नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. याप्रसंगी शिवसेना राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, भाजपाचे प्रफुल्ल भैय्या शेळके, गणेश खैरे, सचिन मेहेत्रे, तनपुरे, प्रशांत खळेकर, महेंद्र उगले, शिवनाथ सत्रे, ज्ञानेश्वर सप्रे आदी उपस्थित होते. शिवसेना तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरत राहुरी शहरातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून नागरिक स्वखर्चातून गटारीवरील तुटलेले ढापे टाकत आहेत. गणेश मंडळांसमोरील उखडलेले रस्ते बुजविण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

संबंधित बातम्या :

कॉलेज रोड, ब्लड बँक रस्ता ते डॉ. कोरडे दवाखाना रस्ता, डॉ. खुरुद दवाखाना समोरील भराव याठिकाणी प्रचंड दैनावस्था झालेली असताना वेळोवेळी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तोंडी तात्काळ कामे मार्गी लावण्याचे सांगून देखील काम होत नसल्याबाबत मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास लांबे यांनी आणून दिले.

शिवसेना – भाजपाच्या वतीने नगर पालिका प्रशासनास दिलेल्या पत्रात म्हटले की, शहरातील भुयारी गटार योजनेचे काम उत्कृष्ट व्हावे व या कामाचे स्वरूप राहुरी शहरातील नागरिकांना अवगत व्हावे, या दृष्टीने राहुरी शहरात किमान 10 ठिकाणी प्रथमदर्शनी भागामध्ये भुयारी गटार योजनेचे अंदाजपत्रक व कामाचे मोजमाप पत्रक फ्लेक्स बोर्ड लावून प्रसारित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
पत्राची दखल न घेतल्यास सदरील कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास राहुरी, नगर, परिषदेचे मुख्याधिकारी यांना दोषी धरून कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी सुजय काळे, शरद येवले, उमेश शेळके, मधुकर पोपळघट, रोहित नालकर,अरुण जाधव, मिलिंद हरिश्चंद्र, अविनाश शिरसागर आदी उपस्थित होते.

134 पैकी 92 कोटींची कामे सुरू
नुकतेच राहुरी शहरामध्ये राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत राहुरी शहरात भुयारी गटार योजने करिता रक्कम 134 कोटी 98 लक्ष निधी देण्यात आलेला आहे. त्यापैकी रक्कम 92 कोटी 98 लक्ष निधीच्या कामाला सुरवात करण्यात आलेली आहे.

हेही वाचा :

Back to top button