

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या संसद भवनसाठी शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छादेखील दिल्या. फडणवीस म्हणाले, 'सर्व घटकातील लोकांना श्रीगणेशाचा आशिर्वाद मिळाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने आणि गणेश चतुर्थीच्या शुभ मुहुर्तावर आज चांगले कार्य घडले आहे. नव्या संसद भवनचा आज श्रीगणेशा झाला. गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रीमंडळ आणि सर्व पक्षाचे सर्व खासदार यांचे मनापासून अभिनंदन करतो.'
फडणवीस म्हणाले, 'गणेशाचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी आहे. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाला वंदन, नमन करून करतो. आज सुखद संयोग जुळून आला. नव्या संसद भवनचा श्रीगणेशा झाला. नव्या संसदेसाठी संपूर्ण देशाचेही अभिनंदन करतो.'