अहमदनगर जिल्हा बँकेला 52 कोटींचा नफा; अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची माहिती | पुढारी

अहमदनगर जिल्हा बँकेला 52 कोटींचा नफा; अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची माहिती

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँक संचालक मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सर्व सभासदांना कर्जफेडीत एक टक्का सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत देणारीही राज्यातील पहिली बँक आहे. बँकेला यंदा 52 कोटी 5 लाखांचा नफा झाला आहे. नियमित कर्जफेड करणार्‍यांना बँक दहा टक्के लाभांश देणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
नगर जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे संचालक सीताराम गायकर, अनुराधा नागवडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, अण्णासाहेब म्हस्के, राहुल जगताप, अंबादास पिसाळ, विकास राळेभात, अमित भांगरे, करण ससाणे, गीतांजली शेळके, आशा तापकीर, सुरेश साळुंखे, आमदार आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड संचालक उपस्थित होते. दरम्यान, संचालक आमदार शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे अनुपस्थित होते.

अध्यक्ष कर्डिले म्हणाले, बँकेच्या इतिहासातली सर्वात मोठी ही सभा आहे. आज जिल्ह्यातून आलेल्या 19 सभासदांना मांडण्याचा संधी मिळाली. त्यांच्या सूचनांचा संचालक मंडळ निश्चित विचार करेल. बँकेच्या हिताच्या सूचनांची निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल. ठेवीदार व सभासदांच्या जोरावर बँकेला यंदाच्या वर्षी 52 कोटी पाच लाखांचा नफा झाला आहे. बँक सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देते त्या कर्जातून मिळणारे व्याज हे बँकेला मिळते आणि त्यामुळे बँकेच्या भांडवलामध्ये वाढ होते.

त्यामुळे बँकेने काही निर्णय शेतकरी हिताचे घेतले आहेत. कायमस्वरूपी कर्ज फेडणारे शेतकरी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येईल. सभासद कर्मचारी यांच्या कष्टाच्या जोरावर बँकेला वैधानिक ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे. बँकेचा राज्यात नावलौकिक झाला आहे. यापूर्वी शेतकर्‍यांना सातबारा, आठ अ उतारा आणण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागत होते. परंतु, आता बँकेतच सातबारा आठ अ उतारा मिळेल. मार्चनंतर उर्वरित शेतकर्‍यांना खेळते भांडवल मिळेल.

पीक कर्जातही वाढ केली आहे. माध्यमिक शिक्षकांच्या ठेवी बँकेत असल्याने त्यांचा अपघात विमा काढला आहे. तसेच कर्मचार्‍यांचाही अपघात विमा काढला आहे. काही सभासदांनी सचिवांची संख्या कमी असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होतो, अशी सूचना मांडली. परंतु, सचिवाची संख्या वाढवणे किंवा सचिवांना पगार बँकेने देणे हा विषय नवीन सहकार कायद्याप्रमाणे तो अधिकार बँकेला नाही.
जिल्ह्यात थकीत कर्जा अभावी 400 सेवा सोसायटी शेवटच्या घटका मोजत आहेत.

या सोसायट्यांना ऊर्जेत अवस्था आणण्यास आणण्यासाठी वन टाइम सेटलमेंट ही योजना आणली आहे. शेतकर्‍यांनी वन टाइम सेटलमेंट केल्यानंतर त्यांना पुन्हा पंधरा दिवसांत कर्ज देण्यात येईल. त्यामुळे सोसायट्यांनाही उर्जितावस्था मिळेल. केंद्र व राज्य जिल्हा बँकेला मदत करीत नाही. जिल्हा बँक ही सभासद ठेवीदार कर्जदाराच्या भरवशावर चालते. ज्येष्ठ संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे, माधवराव कानवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. आभार संचालक मधुकर नवले यांनी मांडली.

सूचना मांडणारे सभासद

कैलास बोराडे, प्रा. भाऊसाहेब कचरे, रामा शेटे, रणजीत बनकर, पंडित गायकवाड, माधव दातीर, लहू थोरात, माऊली हिवरे, प्रशांत दरेकर, अशोक कदम, रामदास झेंडे, पोपट वाणी, अण्णासाहेब बाचकर, मारुती लांडगे, मुक्ताजी फटांगरे, दिनकर गर्जे, प्रवीण पराड, अरुण पाटील कडू यांनी सूचना मांडल्या.

सभासदांनी घातला गोंधळ

संचालकांच्या पदरेश दौर्‍यात सेवा सोसायटीच्या चेअरमनचा समावेश करा. चेटरमन व व्हा. चेअरमन यांनी महागड्या गाड्या कशाला घेतल्या, असा आरोप सभासद ए. आर. गोपाळघरे यांनी केला. त्यांना व्यासपीठावरील प्रशासकीय अधिकार्‍यांनी बोलताना थांबविले. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्या सभासदाला बोलू द्या असा एकाच आवाज उठविला. मात्र, त्याला बोलू दिले नाही. गोपाळघरे यांनी संचालक मंडळावर आरोप खोटे आहेत. गोपाळघरे हे जिल्हा बँकेचे कर्मचारी असताना अफरातफर केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्या आकसापोटी त्यांनी संचालक मंडळावर आरोप केले, असे कर्डिले म्हणाले.

हेही वाचा

PM Vishwakarma Yojana : ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

रायगड : रोहा-नागोठणे मार्गावर वाहतूक कोंडी; २ कि.मी पर्यंत वाहनांच्या रांगा

फ्रान्समध्ये बागेत कोसळले उल्कापिंड!

Back to top button