फ्रान्समध्ये बागेत कोसळले उल्कापिंड!

फ्रान्समध्ये बागेत कोसळले उल्कापिंड!
Published on
Updated on

पॅरिस : फ्रान्समध्ये एक महिलेच्या बगीच्यात अचानक एक जड, रहस्यमय वस्तू कोसळली आणि यामुळे क्षणभर भीती व संभ-माचे वातावरण तयार झाले. ही रहस्यमय वस्तू पडताना काही स्थानिक लोकांनी पाहिली. या रहस्यमय वस्तूने बगीच्यातील टेबलचेही नुकसान झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी त्या वस्तूचे नीट परीक्षण केल्यानंतर तो आणखी एक धक्का होता.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, फ्रान्समधील असंख्य स्थानिक नागरिकांनी 9 व 10 सप्टेंबर रोजी रात्री एक चमकती वस्तू पृथ्वीवर पडताना पाहिली. एका महिलेच्या बागेतच ही वस्तू पडली. ही रहस्यमय वस्तू काय आहे, हे ती त्या दिवशी अंधारामुळे पाहू शकली नाही. पण, दुसर्‍या दिवशी तिने निरीक्षण केले आणि यानंतर जे पाहिले, त्यामुळे तिला धक्काच बसला. कारण, आकाशातून पडलेली ती वस्तू आणखी काहीही नाही तर एक मोठी उल्कापिंड होती.

स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन फ्रिपॉन व्हीजी सिएल आणि अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ फ्रान्सचे एक पथक तपासणीसाठी रवाना झाले आणि त्यांनी ही रहस्यमय वस्तू म्हणजे उल्कापिंडच असल्याचे स्पष्ट केले. एसएएफ चीफ सिल्वेन बाऊली यांनी हे उल्कापिंडच आहे, याला दुजोरा दिला.

सदर उल्कापिंड तीन तुकड्यात विभागले गेले होते आणि त्याचे वजन 700 ग्रॅम इतके होते. अशी उल्कापिंडे पृथ्वीच्या दिशेने फेकली जातात, त्यावेळी ते आणखी गरम होत जातात. याचमुळे ज्या टेबलवर उल्कापिंड कोसळले त्याचे नुकसान होणे साहजिकच होते, असे यावेळी सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news