साकूर येथून चोरट्यांनी पीकअप चोरून नेली | पुढारी

साकूर येथून चोरट्यांनी पीकअप चोरून नेली

साकूर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील साकूर येथील भुजबळ वस्ती येथून घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी पीक अप चोरून नेली आहे. घटनेला पंधरा ते दिवस उलटून गेले पोलिसांना अद्यापही पीक अपचा शोध लागला नाही. येत्या 14 ऑगस्ट 2023 पर्यंत घारगाव पोलिसांनी गाडी शोधून न दिल्यास 15 ऑगस्ट पासून संगमनेर पोलिस उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुनिल निवृत्ती भुजबळ यांनी दिला आहे.

याबाबतचे पत्र संगमनेर पोलिस उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, साकूर येथील भुजबळ वस्तीवर माझ्या कुटुंबासोबत राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. शेतीच्या कामासाठी सन 2013 साली जुनी महिंद्रा बोलेरो पीक अप (नं. एम एच 43 ए. डी. 5367) घेतली होती.

हेही वाचा :

नगर : ग्रामपंचायत सदस्याचे घर पेटविले

Pune Pmc News : पुणे महापालिकेला निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजांचा पुरवठा

Back to top button