पाथर्डीचा एकत्रित विकास आराखडा तयार : आमदार मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डीचा एकत्रित विकास आराखडा तयार : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  दोन वर्षे सत्ता नसताना निधी मिळण्यात अडचणी येत होत्या; मात्र सत्ता आल्यानंतर शहर विकासासाठी भरीव निधी मिळाला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा मोठा निधी मिळणार असून लवकरच शहराच्या लगत असलेल्या नदीचे व स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग 5 मधील आनंदनगर येथील ओढा बंदिस्त गटार करणे या 40 लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रारंभ त्यांच्याच हस्ते करण्यात आला.

त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, माणिक खेडकर, अजय भंडारी, रवींद्र वायकर, अशोक चोरमले, विष्णुपंत अकोलकर, संजय बडे, रमेश गोरे, बजरंग घोडके, अजय रक्ताटे, नितीन एडके, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, बबन बुचकुल, जगदीश काळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, सचिन वायकर, नारायण पालवे आदी उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, की गटारे व पाणी योजनेची कामे पूर्ण झाल्यावर मुख्य रस्त्याचे काम हाती घेतले जाईल. येत्या दोन महिन्यांत पाणी योजनेचे नवीन काम सुरू होणार आहे. येत्या काळासाठी संपूर्ण शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार झाला असून नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून नदीपात्र सुशोभीकरणाचा उपक्रम प्राधान्याने राबविला जाईल. बजरंग घोडके तर प्रास्ताविक केले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ गर्जे यांनी आभार मानले.

अन्यथा उमेदवारी गृहीत धरू नका : राजळे
परत सत्तेत यायचे असेल तर पक्ष संघटनेचे काम केलेच पाहिजे. पक्षाचा चौथा सर्व्हे सुरू झाला असून पक्षासाठी केलेल्या कामाची नोंद पाहिली जाईल. त्यामधून माझ्यासह तुमचे सर्वांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बूथनिहाय संघटना मजबूत होण्यासाठी गांभीर्याने काम करा. पक्षकार्यासाठी काम करा. अन्यथा उमेदवारीबाबत शक्यता गृहीत धरू नका, असे आमदार राजळे यांनी कार्यकर्त्याना सांगितले.

 

Back to top button