नगर : दोन कार चोरणार्‍या एकाला बेड्या | पुढारी

नगर : दोन कार चोरणार्‍या एकाला बेड्या

नगर :  पुढारी वृत्तसेवा : दोन कारची चोरी करणार्‍या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीला जालना येथून अटक करण्यात आली. समीर कादीर शेख (वय 25, रा. संजयनगर, देऊळगावराजा, जि.बुलढाणा, हल्ली रा.जालना) असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार नदीम दाऊद शेख (रा. दुधा, जि. बुलढाणा, हल्ली रा. जि.जालना) हा पसार झाला.
नगर शहरातील मंगलगेट भागातील प्रवीण अशोक राहिंज (वय 32) यांची एकवीरा चौकातील सीटीप्राईड हॉटेलजवळ उभी केलेली कार चोरीला गेली होती.

ही चोरी समीरने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला जालना येथून अटक केली. नदीम शेखच्या मदतीने त्याने नगर व लासलगाव (नाशिक) येथून दोन कार चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी नदीमच्या जालना येथील घराजवळून पाच लाख रुपये किमतीच्या दोन कार हस्तगत केल्या. उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, संदीप पवार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा : 

Adipurush : लोकांच्या भावना दुखावल्या, मी हात जोडून माफी मागतो-मनोज मुंतशिर

पुणे : साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज

Back to top button