वाळकी : भरदिवसा बंद घर फोडून; सोन्याचे दागिने लांबविले | पुढारी

वाळकी : भरदिवसा बंद घर फोडून; सोन्याचे दागिने लांबविले

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील कौडगाव जांब येथे बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी 70 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना गुरुवारी (दि.22) सकाळी 9 ते दुपारी 3 च्या दरम्यान घडली. याबाबत सोमनाथ संभाजी मिंड (रा. कौडगाव जांब, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मिंड हे खाजगी नोकरी करत असून त्यांचे गावामध्ये घर आहे. गुरुवारी (दि.22) सकाळी ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते.

सकाळी 9 ते दुपारी 3 च्या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 70 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. मिंड हे दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत मिंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

पुणे : कैद्यांना स्मार्टकार्ड फोनद्वारे नातेवाईकांशी साधता येणार संवाद

खरवंडी कासार : दुर्धर आजारग्रस्त महिलेची फरफट; कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाने अर्ज गहाळ

बोधेगाव : जायकवाडीच्या पाण्यासाठी लढा : ऋषिकेश ढाकणे

Back to top button