बेलापूर : जनतेच्या विश्वासामुळे सत्ता मिळते : माजी आ.भानुदास मुरकुटे | पुढारी

बेलापूर : जनतेच्या विश्वासामुळे सत्ता मिळते : माजी आ.भानुदास मुरकुटे

बेलापूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांशी निगडीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अनेक विकास कामे करावयाची आहेत. यासाठी सत्तेचे पाठबळ लागते. यासाठीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा., मी व करण ससाणे यांनी युती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, आम्ही कायम जनतेत असतो म्हणूनच आम्हाला सत्ता मिळते, हे केवळ निवडणुकांच्यावेळी अवतरणारांनी ध्यानात ठेवावे, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

कृ.उ.बाजार समिती निवडणुकीत श्रीरामपूर सहकार विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बेलापूर येथील मेळाव्यात मुरकुटे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, श्रीसाई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, माजी सभापती नानासाहेब पवार, डीपीडीसीचे सदस्य बाबासाहेब दिघे, जि. प. माजी सदस्य शरद नवले, लोकसेवा विकास आघाडीचे एध्यक्ष हिंमतराव धुमाळ, सुनील मुथा, भास्कर खंडागळे, रवी खटोड, सुधीर नवले, अभिषेक खंडागळे, राम पोळ आदी उपस्थित होते.

मुरकुटे म्हणाले, श्रीरामपूर बाजार समितीला उर्जितावस्था मिळवून द्यायची आहे. मुख्य बाजार समितीसह बेलापूर व टाकळीभान उप बाजार समितींमध्ये जनावरांचे बाजार, कांदा मार्केट सुरू करण्यासह अनेक विकास कामे करावयाची आहेत. तालुक्यात खंडकरी व आकारी पडीत शेतकर्‍यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक गावांची गावठाण हद्द संपली. हद्द वाढीसाठी शेती महामंडळाची जागा मिळवायची आहे. हेसर्व प्रश्न महसूल मत्र्यांशी निगडीत आहेत. त्यांनी याप्रश्नी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, असे मुरकुटे यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही युती केली आहे. सत्तेसाठी आम्ही झुकत नाही तर आम्ही नादी लागणारांना घुडगे टेकवायला लावतो, हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणारांनी ध्यानात घ्यावे, असे इशारा मुरकुटे यांनी दिला. स्वागत व प्रास्ताविक सचिन गुजर यांनी केले. देवीदास देसाई यांनी सुत्रसंचालन तर सरपंच महेंद्र साळवी यांनी आभार मानले.

यावेळी भरत साळुंके, जालिंदर कुर्‍हे, प्रकाश नाईक, शेषराव पवार, भगवान सोनवणे, भाऊसाहेब कुताळ, किशोर नवले, शिवाजी वाबळे, ज्ञानदेव वाबळे, पंडितराव बोंबले, भास्कर बंगाळ, दत्ता कुर्‍हे, विलास मेहेत्रे, प्रकाश नवले, सुधाकर खंडागळे, बाळासाहेब वाबळे, अनिल नाईक, मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले, रमेश अमोलिक, प्रभात कुर्‍हे, पुरुषोत्तम भराटे, वैभव कुर्‍हे, प्रसाद खरात, सुरेश कुर्‍हे, रामचंद्र राशिनकर, विलास कुर्‍हे, प्रकाश कुर्‍हे, असिफ बागवान, हाजी ईस्माइल शेख, मोहसीन सय्यद, जीना शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button