पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी; करंजी ग्रामपंंचायतीचा उपक्रम | पुढारी

पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी; करंजी ग्रामपंंचायतीचा उपक्रम

करंजी(नगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीने दहा लाख रुपये खर्चून उभारलेल्या आरओे प्लँटच्या माध्यमातून पाच रुपयांत वीस लिटर या दराने थंड, शुद्ध पाणी ग्रामस्थांना चोवीस तास मिळते. दररोज बाराशे लिटर पाणी खास पिण्यासाठी नागरिक येथून घेऊन जात आहेत. ग्रामपंचायतीने गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हा आरओ प्लँट सुरू केला. या ठिकाणी दररोज पाच हजार लिटर पाणी साठवले जाते. त्यातून दररोज दोन हजार लिटर पाणी शुद्ध करण्याची मशिनरीची क्षमता आहे. सध्या दररोज बाराशे लिटर पाणी नागरिक या प्लँटमधून नेत आहेत.

सध्या उन्हाचा कडाका असल्यामुळे थंडगार व शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. करंजीत दररोज शंभर दीडशे खासगी जारद्वारे पाणी विकले जाते. वीस लिटरचा जार तीस रुपयांना विकला जातो, अशा परिस्थितीत करंजी ग्रामपंचायतीने सुरू केलेला हा प्लँट दिलासादायक ठरला आहे. यावेळी छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे, शेखर मोरे, विकास अकोलकर, वैभव क्षीरसागर, सागर टेमकर, सूरज फणसे, अनिल भिटे, किशोर क्षेत्रे, शुभम मुटकुळे, सुनील क्षेत्रे, विजय भांड आदी उपस्थित होते.

ना नफा ना तोटा या तत्त्वावर या आर ओ प्लँटद्वारे पंचवीस पैसे लिटरप्रमाणे शुद्ध व थंडगार पाणी देण्यात येत आहे. छोटे-मोठे व्यावसायिकही येथून पाच रुपयांत वीस लिटर पाणी घेऊन जाऊ शकतात.

                                       – बी. पी. काळापहाड, ग्रामविकास अधिकारी

Back to top button