कोपरगावात बिबट्याने पाडला शेळीचा फडशा | पुढारी

कोपरगावात बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा संचार वाढला आहे. 21 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुर्‍हे यांच्या मालकीच्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. याबाबत माजी सरपंच यादवराव संवत्सरकर म्हणाले की, माझे शेता शेजारील कुर्‍हे यांच्या मालकीची शेळी बिबट्याने ओढून आपल्या शेतात आणली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जाग आली.

वस्ती नजिक रानडुक्कर असावे, असा संशय आल्याने त्यांनी हातात तत्काळ बॅटरी आणि शस्त्र घेतले व घराच्या बाहेर येऊन त्यांनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकत मोठ मोठ्याने आरोळ्या मारण्यास सुरुवात केली. रानडुक्कर सदृश प्राणी चक्क बिबट्या निघाला. त्याच्या तावडीतून शेळीला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही. आरडाओरड केल्याने बिबट्याने नारंदी नदीकडे धूम ठोकली.

Back to top button