गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ : खा. सदाशिव लोखंडे | पुढारी

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ : खा. सदाशिव लोखंडे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्याच्या पश्चिम भागातील गारपिटीने निमगाव खुर्द, सावरचोळ, मेंगाळवाडी आणि पेमगिरी या गावातील नुकसान झालेल्या कांदा टोमॅटो व फळ पिकांची खा. सदाशिव लोखंडे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत मिळून देण्याकरिता प्रयत्नशील राहील, असे आश्वासन खा सदाशिव लोखंडे यांनी शेतकर्‍यांना दिले. संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, सावरचोळ, मेंगाळवाडी, पेमगिरी नांदुरी, दुमाला या गावातील शेतकर्‍यांच्या शेतमालाचे गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी वरील गावातील शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर लगेचच शिर्डीचे खा. लोखंडे यांनी निमगाव खुर्द येथील प्रवीण कासार यांचा घेवडा आणि भाऊसाहेब कासार यांचे डाळिंब सावरचोळ येथील सुनील कानवडे ज्ञानेशवर कानवडे, तुकाराम कानवडे यांची मिरची पिकाची पाहणी केली.

तसेच वादळामुळे पडझड झालेल्या घरांचीही पाहणी केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतपिकांचे तसेच वादळाने पडलेल्या घरांचे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख, रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख विकास भरीततकर, महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, अशोक कानवडे, रावसाहेब डुबे, निमगाव पागाचे सरपंच प्रकाश कानवडे, का. पो. राजेंद्र कानवडे, सुनील कानवडे , विठ्ठल ढगे, दिलीप कोल्हे, संजय पावसे, निलेश डुबेआदींसह शेतकरी सहभागी झाले होते. शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या.

अधिकार्‍यांना खा. लोखंडे यांनी धरले धारेवर
वादळ वार्‍यामुळे नुकसान झाले आहे, अशांना तात्काळ शासनाच्या वतीने 20 किलो धान्य महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पोहोच करावे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले असतानाही अद्यापही ही मदत नुकसाग्रस्तांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे खा. लोखंडे यांनी महसूलच्या अधिकार्‍यांना बोलावून त्यांना धारेवर धरीत धान्य पोहच करण्याच्या सूचना केल्या.

Back to top button