नगर : तरुणाकडून महिलेला मारहाण करत विनयभंग | पुढारी

नगर : तरुणाकडून महिलेला मारहाण करत विनयभंग

नगर; पुढारी वृत्तसेवा : महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि.10) नगर-मनमाड रस्त्यावरील अ‍ॅपेक्स हॉस्पीटल जवळ घडली. संबंधित महिला सिझरचे टाके दुखत असल्याने दवाखाण्यात उपचारासाठी आली असता पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी महिलेसोबत हुज्जत घातली. त्यातील एकाने महिलेचा टि-शर्ट फाडून पोटावर लाथ मारली. महिलेच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्बास ऊर्फ शुभम वाकळे, साहिल वाकळे, साहिल वाकळेची आई, साहिल वाकळेची बहिण (सर्व रा.बाबा सर्व्हिस सेंटर,नगर-मनमाड रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिझर झाल्याने दवाखान्यात उपचार घेण्यासाठी संबंधित महिला आली असता बाबा सर्व्हिस सेंटरजवळ वाहन लावण्याच्या कारणावरून आरोपींनी महिलेशी वाद घातला. तसेच, आरोपींनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शुभम वाकळे याने पोटावर लाथ मारत अंगातील टि-शर्ट फाडत महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

Back to top button