पारनेर : बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करू : आमदार नीलेश लंके | पुढारी

पारनेर : बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करू : आमदार नीलेश लंके

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत निघोज येथे आमदार नीलेश लंकेंचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर नवी मुंबई स्थित पिंपळगाव रोठावासीय बचत गटाच्या महिलांनी मुंबईत आमदार निवासात आमदार लंकेंचा वाढदिवस केला. यावेळी बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी दिले. आमदार नीलेश लंके महिला कल्याणकारी संस्था पुरस्कृत महिला बचत गटांची नवी मुंबई येथे स्थापना करण्यात आली.

या गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याची माहिती आमदार लंकेंना देण्यात आली. नीलेश लंके महिला प्रतिष्ठाणच्या खजिनदार चौगुले म्हणाल्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणे, यशस्वी महिला उद्योजकांच्या माध्यमातून कौशल्य गुण विकसित करणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगार व उद्योग निर्मिती करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमूद केले. महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राचे सहकार्य मिळावे अशी मागणीही करण्यात आली.

महिला बचत गटाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर सकारात्मक विचार करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. यावेळी केक कापून आमदार लंकेंचा वाढदिवस आयोजित केला. यावेळी वैष्णवी माता बचत गट, वीर जिजामात बचत गट, कुलस्वामिनी बचत गट, महालक्ष्मी बचत गट, महाराणी लक्ष्मीबाई बचत गट, सरस्वती बचत गट, म्हाळसादेवी बचत गट आदी गटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशोक घुले, कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा शालिनी घुले, अमोल घुले उपस्थित होते.

Back to top button