नेवासा : रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत : आमदार गडाख | पुढारी

नेवासा : रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत : आमदार गडाख

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : रस्त्यांच्या कामांसाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. सर्वच कामे दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनी दक्ष राहिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख यांनी केले. कुकाणा ते चिलेखनवाडी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आमदार गडाख यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक देसाई देशमुख, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के,भय्यासाहेब देशमुख, भाऊसाहेब मोटे, अशोक मंडलिक, मार्केट कमिटीचे उपसभापती वसंतराव देशमुख, एकनाथ कावरे, दत्तात्रय खाटीक उपस्थित होते.

गडाख म्हणाले. मंत्री असताना आपण 2 कोटी 50 लाख रुपये मंजूर करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. निधीची कमतरता असतानाही काम तातडीने पूर्ण करून दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. रस्ता काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावे, यासाठी मी कटिबद्ध आहे. नारायणराव म्हस्के, संतोष म्हस्के, सोपान घोडेचोर, नानाभाऊ नवथर, बाळासाहेब कचरे, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, चेअरमन संजय सावंत, पाथरवलाचे सरपंच हरिभाऊ थोरे उपस्थित होते.

Back to top button