काष्टी : कापसाचा ट्रक आगीत जळून खाक | पुढारी

काष्टी : कापसाचा ट्रक आगीत जळून खाक

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यात नगर-दौंड महामार्गावर काष्टीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगवी फाट्यावर बारामतीकडून अहमदाबादकडे कापूस घेऊन चाललेल्या ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत ट्रकसह संपूर्ण कापूस जळून खाक झाला. आगीत अंदाजे 50 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

बारामती येथील जीटीएन कंपनीचा कापूस श्रीनाथ ट्रान्सपोर्टमार्फत सागर भोसले यांच्या ट्रकमध्ये सोळा टन कापूस घेऊन दि.24 रोजी रात्री नऊ वाजता बारामती एमआयडीसीमार्गे भिगवण येथून निघाला. कुरकुंब, दौंड येथून नगरच्या दिशेने येत असताना शुक्रवारी (दि. 25) मध्यरात्री दीडच्या सुमारास चालक विठ्ठल भवर यांना ट्रकला आग लागल्याचे आरशात दिसले.

त्यांनी प्रसंगावधान राखून सांगवी फाट्यावर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबविली. चालक भवर व सहकारी विशाल भवर ट्रकमधून खाली उतरले. तेव्हा संपूर्ण ट्रकला भीषण आग लागल्याचे दिसले. मदतीसाठी चालकाने प्रयत्न केला. परंतु मध्यरात्रीची वेळ असल्याने आग विझविण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. तोपर्यंत संपूर्ण ट्रक कापसासह जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Back to top button