नगर : विकासकामे पाहा, मग हिशेब मागा ! : भाजपचे ज्येष्ठ नेते रामजी केसभट | पुढारी

नगर : विकासकामे पाहा, मग हिशेब मागा ! : भाजपचे ज्येष्ठ नेते रामजी केसभट

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या काळात आमदार मोनिका राजळे यांना निधीपासून वंचित ठेवले जात होते. परंतु आता शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात मोठा निधी मिळाल्याने विकासकामे होत आहेत. विरोधकांनी विरोधासाठी विरोध न करता मतदार संघात फिरून विकासकामे पाहूनच् आमदार राजळे यांना विकासकामाचा हिशेब मागावा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते रामजी केसभट यांनी केले. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नांतून गावांतर्गत काँक्रिटीकरण, तसेच उर्वरित मजबुतीकरण व डांबरीकरणा, शेवगाव-गेवराई रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, या 4 कोटी 25 लक्ष रूपये खर्चाच्या कामांचा प्रारंभ श्री काशी केदारेश्वर देवस्थानचे मठाधिपता महंत बाबा गिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी केसभट बोलत होते.

केसभट म्हणाले, सध्या विरोधक आमदार राजळे यांना विकासकामाचा हिशेब मागत आहेत. बोधेगाव येथील दुरवस्था झालेल्या शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील बोधेगावचा मुख्य रस्ता कामाची ग्रामस्थांची मागणी होती. या रस्त्यासंदर्भात वेळोवेळी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदार राजळे यांनी हा रस्ता मंजूर करून प्रश्न मार्गी लावला. या भागात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आमदार राजळे यांनी विकास केला. त्यामुळे विरोधकांनी विरोध न करता दोन्ही तालुक्यांतील कामांची पाहणी केली पाहिजे. आमदार राजळे यांनी किती निधी आणला, याचा आढावा घेतला पाहिजे.

त्यानंतर विरोध केला पाहिजे. यावेळी भाजपचे नेते संदीप देशमुख, कांबीचे उपसरपंच सुनील राजपूत, सरपंच दादासाहेब भुसारी, सरपंच संजय खेडकर, केशव आंधळे, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, सुगंध खंडागळे, बाबा सवळकर, दत्तू जाधव, शेरखा पठाण, दत्ता थोरात, अनिल परदेशी, बबनराव घोरतळे, राजेंद्र डमाळे, बाबासाहेब मगर, श्रीरंग गोरडे, कुद्दुस पठाण, राजळे फिटर, रामेश्वर डाके, आदी उपस्थित होते. आभार बाबा सवळकर यांनी मानले.

 

Back to top button