नगर : अमरधाम परिसरात होणार पार्किंग व्यवस्था | पुढारी

नगर : अमरधाम परिसरात होणार पार्किंग व्यवस्था

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्यात राबविले जाणारे स्वच्छता अभियानात यावेळी अमरधाम परिसर स्वच्छ करण्यात आला. अमरधाम परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे अमरधाममधील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने नालेगाव अमरधाम येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक श्याम नळकांडे, अजय चितळे, घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते. उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, अमरधाममध्ये साचलेले कचर्‍याचे ढीग उचलले असून सर्व परिसर स्वच्छ केला आहे.

अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे परिसरात गर्दी होते. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे. महापालिकेचे काम आहे. त्यानुसार सर्व कामे लवकरच पूर्ण केली जातील. स्वच्छता अभियान ही काळाची गरज असून नगरकरांनी महापालिका राबवित असलेल्या स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सहकार्य करावे.

Back to top button