नगर : कासारेत 6 तोळे, आश्वीत सोन्याची पोत लांबविली | पुढारी

नगर : कासारेत 6 तोळे, आश्वीत सोन्याची पोत लांबविली

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील कासारे येथे बंद घराचे कुलूप तोडून भर दिवसा चोरट्यांनी 6 तोळे सोन्याचे दागिने तर आश्वी येथे सराफाच्या दुकानाबाहेर सोन्याची पोत चोरट्याने लांबविल्याने संताप व्यक्त होत आहे. कासारे शिवारात चोरट्यांनी परसराम वामन कार्ले यांच्या बंद घराचे भर दुपारी कुलूप तोडून घरातील पेटीतील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र व अडी तोळ्यांचे नेकलेस चोरून नेले. याबाबत परसराम कारले यांनी संगमनेर तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. दुसर्‍या घटनेत, आश्वी येथील कुलथे ज्वेलर्स यांच्या दुकानाच्या ओट्यावर दागिने गाठणे दुकान आहे. येथे दागिणी गाठण्यास आणलेली सोन्याची पोत एका 45 वर्षीय महिलेसह अल्पवयीन मुलीने चोरून पलायन केले. याबाबत सोमनाथ भालकर (रा. पानोडी) यांनी आश्वी पोलिसात फिर्याद दिली.

संगमनेर तालुका पोलिस स्टेशनहद्दीत ग्रामीण भागात घरफोडी व चोर्‍यांचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे हे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत. ग्रामीण भागात विहिरीवर, शेततळ्यावर तलावावर विद्युत मोटारी, मोटार सायकली चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

पोलिसांवर नाराजी !
संगमनेर शहरासह ग्रामीण भागात घरफोड्या, चोर्‍या, पाकीट मारीचे सत्र कमी होण्याऐवजी सुरुच असल्याचे दिसते. तीन-चार महिन्यांत तालुका, शहरासह आश्वी व घारगाव या चारही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घर फोड्या व चोर्‍या झाल्या. यासर्व प्रकरणांचा तपास लावण्यात चारही पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍यांना अपयश आले आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button