डॉ. आंबेडकर स्मारकासाठी भीमसैनिकांचा अकोलेत मोर्चा | पुढारी

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी भीमसैनिकांचा अकोलेत मोर्चा

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अकोले येथे कोल्हार – घोटी रोड लगत म. फुले चौकात 50 वर्षांपासून बौद्ध समाजाची स्मशानभूमीच्या 30 गुंठे जागेवर अतिक्रमण झाले होते. त्या जागेचा ताबा घेवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, जागा प्रशासनाने स्मारकासाठी द्यावी आदी मागण्यांसाठी बौद्ध समाज स्मशानभूमी ते तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
म. फुले चौकात 30 गुंठे जागा ताब्यात घेऊन डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारणीचा संकल्प करीत कुदळ मारण्यात आली.

या मोर्चामध्ये आ. डॉ. किरण लहामटे, माजी आ. वैभव पिचड, कॉ. अजित नवले, साथी विनय सावंत, कैलास वाकचौरे, बाजीराव दराडे, महेश नवले, मनोज मोरे, मिनानाथ पांडे, महिला आयोग सदस्या उत्कर्षाताई रुपवते, सुमन जाधव, पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मशानभूमी जागेचे नामांतर स्मारक म्हणून करावे, स्मारक जागेची सरकारी मोजणी करा, जागा, स्मारक समितीकडे वर्ग करा, राज्य किंवा केंद्राच्या मदतीने तेथे स्मारक उभारावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सतिष थेटे यांना देण्यात आले.  यावेळी रिपब्लिकन पक्ष उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम, जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, सरचिटणीस तुकाराम जाधव, रमेश बनसोडे, किरण रोहम, किशोर चव्हाण, अन्वर पठाण, राजेंद्र घायवट व भीमसैनिक उपस्थित होते.

 

Back to top button