नगर : अंमळनेरमध्ये गडाखांचाच भगवा..! | पुढारी

नगर : अंमळनेरमध्ये गडाखांचाच भगवा..!

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील अंमळनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गडाख समर्थक शांताबाई चांगदेव मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अंमळनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख व सुनील गडाख यांचे निकटवर्तीय ज्ञानेश्वर आयनर यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेशा जनसेवा मंडळाने सरपंचासह सात जागा जिंकून सत्ता परिवर्तन केले होते. काल लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड झाली.

शांताबाई मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. यावेळी सदस्य दत्तात्रय बाचकर, ज्ञानेश्वर माकोणे, सखुबाई रतन कणगरे, बेबीताई रावसाहेब पवार, कमलबाई भीमा बर्डे यासह मुळा कारखान्याचे माजी संचालक कर्णासाहेब पवार, अण्णासाहेब माकोणे, बलभिम घावटे, शिवाजी घावटे, सोपानराव सुपनर, अरविंद घावटे, प्रा. दशरथ आयनर, रावजी सुपनर, शिवाजी आयनर, संपत महाराज पवार ,भगीरथ माकोणे, चंद्रकांत माकोणे, नानासाहेब बर्डे, काशिनाथ आयनर, नानासाहेब माकोणे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी आनंद रुपनर, तर सहायक म्हणून ग्रामसेविका सविता बाचकर यांनी सहकार्य केले

Back to top button