संगमनेर : साकूरला पकडली 8 लाखांची दारू | पुढारी

संगमनेर : साकूरला पकडली 8 लाखांची दारू

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठारभागातील साकूर ग्रामपंचायतची निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवाराच्या पतीस देशी विदेशी दारू घेऊन फिरत असताना घारगाव पोलिसांच्या पथकाने पकडून त्याच्या कडून सुमारे महिला 8 लाख 570 रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक सुरू आहे. घारगाव पोलिसांच्या रात्री गस्त घालणार्‍या पथकास, साकुर येथे लाल रंगांची चारचाकी गाडी एमएच. 17 सी.एम9295 यामध्ये दारूअसल्याची खात्रीलायक माहिती एका खबर्‍याच्या मार्फत पोलिसांना मिळाली होती.

त्यांनी तात्काळ जागेवाडी साकुर येथे जाऊन या लाल रंगाची गाडी रस्त्यावर हटकवली. गाडीची झडती घेत असताना गाडीच्या पाठीमागच्या डिकीमध्ये अवैधरित्या दारु आढळून आली. यात विदेशी रॉयल चॅलेंज बॉटल, विदेशी रॉयल स्टेग, संत्रा देशी दारू कारमध्ये असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी तो सर्व मुद्देमाल जप्त केला. याबाबत घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शांताराम गाडेकर व ऋषिकेश गाडेकर दोघेही (रा. जांबुत रोड, साकूर) या दोघांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको वायाळ करत आहे.

Back to top button