पाथर्डी : आ.लंकेंना पाठिंबा; पाथर्डीत बंद ! | पुढारी

पाथर्डी : आ.लंकेंना पाठिंबा; पाथर्डीत बंद !

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातून जाणार्‍या कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर व्हावे, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या पाथर्डी तालुका बंदला शहरासह तालुक्यातील काही गावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. गुरूवारी सकाळी महाआघाडीचे कार्यकर्ते भगवान दराडे, डॉ. दीपक देशमुख, नासिर शेख, वैभव दहिफळे, सचिन नागापुरे, आनंद सानप, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, चंद्रकांत भापकर, सीताराम बोरुडे, उबेद आतार, अरविंद सोनटक्के, संदीप राजळे, चांद मणियार, योगेश रासने, अक्रम आतार, मुन्ना खलिफा, किशोर डांगे, सुनील दौड, आतिष निर्‍हाळी, आकाश काळोखे, जुनेद पठाण,विष्णूपंत ढाकणे, युसूफ खान, महेश दौंड, अनिकेत निनगुरकर, गणेश दिनकर आदी कार्यकर्ते संपूर्ण शहरात फिरले व त्यांनी पेठेतील व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी सातत्याने सर्वच पक्षांनी आंदोलने केली होती. मात्र, ते अद्याप पूर्ण झाली नाही. या रस्त्याचया कामासाठी आमदार लंके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून सर्वसामान्य नागरिकांसह भाजप सोडून सर्व पक्षांनी याला पाठिंबा दर्शविला आहे. गुरुवारी पाथर्डीसह तालुका बंद या आंदोलनाला व्यापार्‍यांनी प्रतिसाद देत आपले व्यवसाय बंद ठेवले. दुपारी 12 नंतर मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. या शिवाय तालुक्यातील खरवंडी कासार, मिडसांगवी आदी गावातही बंद पाळण्यात आले.

Back to top button