अकोले : सरपंच 25 तर सदस्यांसाठी 101 उमेदवार रिंगणात | पुढारी

अकोले : सरपंच 25 तर सदस्यांसाठी 101 उमेदवार रिंगणात

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यक्रम सुरू असून बुधवारी माघारीच्या दिवशी सोमलवाडी व शिळवंडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली असून 9 ग्रामपंचायतीची निवडणूक मतदान दि. 18 तर दि. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. आंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहित बुद्रुक, शेंडी, वाकी, शिळवंडी, सोमलवाडी, मुरशेत या 11 ग्रामपंचायत निवडणूकीत बुधवारी दि. 7 डिसेंबर माघारीच्या दिवशी सरपंच पदासाठी 11 पदासाठी 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु 22 उमेदवारांनी सरपंच पदासाठी माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात 25 जण उरलेले आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 193 पैकी 92 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर 101 उमेदवार ग्रामपंचायत सदस्य निवडणूकीच्या रिंगणात आहे.

सरपंच पदासाठी सोमलवाडी व शिळवंडी या 2 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर 41 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले. तर ग्रा. पं. सदस्य उमेदवार 101 निवडणूक रिगंणात उतरले आहे. तसेचं 9 ग्रा.पंचायत साठी 25 उमेदवार सरपंच पदासाठी निवडणूक लढवणार आहे. परंतु अकोले तालुक्यातील भाजपाचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड,राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.

मात्र 11 ग्रामपंचायत निवडणुकीत 2 ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सरपंच पद व ग्रामपंचायत सदस्य उमेदवारासाठी माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आ. वैभव पिचड, विद्यमान आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांची ताकद पणाला लागणार असली तरी मात्र कोणाच्या वाटयाला किती ग्रामपंचायत सरपंच, सदस्य येणार याकडे अकोले तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button