नगर : चोवीस विद्युत रोहित्र ‘शटडाऊन’ | पुढारी

नगर : चोवीस विद्युत रोहित्र ‘शटडाऊन’

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहर व उपनगरात आज दिवसभर वीज गायब होती. सावेडी उपनगरातील सुमारे 24 डीपी शटडाऊन झाल्या होत्या. पाईपलाईन रस्त्यावरील मुख्य विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने महावितरणचे कर्मचारी दिवसभर फॉल्ट शोधत होते. सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत झाला. सावेडी उपनगरामध्ये आज एकीकडे मुसळधार पाऊस अन् दुसरीकडे वीज गायब झाल्याने नागरिक हैराण झाले होते.

सावेडीतील पाईपलाईन व कांदबरी नगरी फिडर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडले. तर, सावेडी उपनगरला विद्युत पुरवठा करणारी मुख्य विद्युत वाहिनीही बंद करण्यात आली. त्यामुळे आज सकाळीपासून सावेडी उपनगरासह परिसरातील 24 डीपी शटडाऊन करण्यात आला होते. तर, महाविरणचे कर्मचारी आज दिवसभर फॉल्ट शोधत होते. सायंकाळी उशिरात त्यांना फॉल्ट शोधण्यात यश आले. त्यामुळे पाईपलाईन फिडर सुरू करण्यात आले. मात्र, रात्रीपर्यंत कांदबरी नगरी फिडर सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू होते.

Back to top button