संगमनेर : माजी सदस्यासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी; जागेच्या वादावरून केली होती जातीवाचक शिवीगाळ | पुढारी

संगमनेर : माजी सदस्यासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी; जागेच्या वादावरून केली होती जातीवाचक शिवीगाळ

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील घुलेवाडी शिवारात तलाठी कार्यालयाजवळ विद्या संतोष अभंग व कविता संतोष अभंग या महिलांना मालमत्तेच्या जुन्या वादावरून जिल्हा परिषद माजी सदस्य सीताराम पुंजाजी राऊत यांनी भर रस्त्यात अडवत अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यासह तिघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले.

तालुक्यातील घुलेवाडीचे रहिवासी संतोष अभंग हे हयात असताना त्यांच्या जमीन डेव्हलपमेंटचा करार माजी जि. प. सदस्य सीताराम पुंजा राऊत व सुनील बन्सी राठी यांनी केला होता. मात्र, राऊत यांनी अभंग कुटुंबीयांची फसवणूक केली. त्यांच्याच खासगी मालकीच्या रस्त्यावर हक्क सांगण्यास सुरवात केली. अभंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना राऊत सतत त्रास देत होते.

घुलेवाडी तलाठी कार्यालयामध्ये उतारा काढण्यासाठी कविता अभंग, मुलगी विद्या अभंग व भारत भोसले (19 सप्टेंबर 2022) रोजी गेले असता राऊत यांनी अभंग यांच्या गाडीस स्वतःची गाडी आडवी लावून रस्ता अडवून अभंग हिस जाती वाचक शिवीगाळ करुन जातीचा अपमान केला. त्यावेळी अभंग व राऊत यांच्यात भांडणे झाली.

या घटनेची माहिती समजताच राऊत यांचे भाऊ संजय पुंजा राऊत व संतोष लहानू राऊत यांच्यासह 10 ते 15 अनोळखी व्यक्तिंनी अभंग यांच्या घरी येऊन पुन्हा शिवीगाळ करून, घरासमोरील कुंड्या फेकल्या. खिडकीच्या काचा फोडून पाण्याची टाकी व स्कुटी लोटून देत नुकसान केले.

याबाबत कविता अभंग यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सिताराम पुंजा राऊत, संजय पुंजा राऊत, संतोष लहानू राऊत या तिघांसह इतर 10 ते 15 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमानव्ये गुन्हा नोंदवि ला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपाधीक्षक राहुल मदने करीत आहेत.

Back to top button