जामखेड : आ.राम शिंदे अ‍ॅक्टिव्ह; पवारांना धक्का! | पुढारी

जामखेड : आ.राम शिंदे अ‍ॅक्टिव्ह; पवारांना धक्का!

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांना आमदार राम शिंदे यांनी धक्का देत राष्ट्रवादीचे आरणगाव ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना भाजपमध्ये दाखल करून घेतले. आमदार शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यामुळे आरणगाव ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी भाजपची सदस्य संख्या 7 वर गेली आहे. तालुक्यातील राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाच्या आरणगाव ग्रामपंचायतीत आमदार प्रा. राम शिंदे गटाचे उद्योगपती अमोल शिंदे, माजी सरपंच आजिनाथ नन्नवरे, अंबादास राऊत, जामखेड तालुका भाजपचे सरचिटणीस लहुजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी भाजपचे अंकुश शिंदे व उपसरपंचपदी सविता अप्पासाहेब राऊत यांची निवड झाली होती.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अधिकारी वर्गावर दबावतंत्रातून सरपंच शिंदे यांच्या विरोधात निकाल मिळवले. परंतु सरपंच शिंदे यांनी उच्च न्यायालयाने दिलासा देत सरपंच, उपसरपंचांची निवड कायम ठेवली. त्यातच आता हे 2 सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. नुकतेच कापरेवाडी (ता. कर्जत) येथे पारेवाडी ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. संजय बाबुराव पारे व गहिनीनाथ डमाळे, लिंबू व्यापारी गोवर्धन राऊत, राजेंद्र निगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, पिंपरखेड माजी सरपंच बापूराव ढवळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पाटोदा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, पांडुरंग उबाळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, गणेश क्षीरसागर, तात्या माने, उद्योगपती अमोल शिंदे, भाजप सरचिटणीस लहू शिंदे, गोवर्धन राऊत, अतुल पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष नन्नवरे, सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच राऊत, सदस्य डॉ. सीताराम ससाणे, रमजान शेख, राजेंद्र निगुडे, सचिन राऊत, निखिल पंडित, प्रवीण नन्नवरे, रामा शिंदे, जालिंदर पारे, रावसाहेब पारे, कालिदास पारे आदी उपस्थित होते.

दरम्यान,कर्जत-जामखेडमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत आमदार पवारांना आमदार शिंदेंनी दिलेला हा मोठा राजकीय धक्का समजला जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडमधील प्रवेश सोहळ्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सत्याचा विजय झाला : सरपंच शिंदे
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अधिकारी वर्गावर दबाव आणून आमच्या विरोधात निकाल देण्यास भाग पाडले. परंतु या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने दिलासा दिला व सरपंच, उपसरपंचांची निवड कायम ठेवली. त्यातच हे सदस्य भाजपत आल्याने ताकत वाढली आहे. त्यामुळे शेवटी सत्याचाच विजय झाला, अशी प्रतिक्रिया सरपंच अंकुश शिंदे यांनी व्यक्त केली.

Back to top button