नगर : दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा सासरी छळ | पुढारी

नगर : दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा सासरी छळ

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून बाहेर हाकलून देण्यात आले. या घटने बाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा विलास डुकरे (रा. राहुरी फॅक्टरी) या तरुणीने राहुरी पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. पूजा विलास डुकरे ही तरुणी नेवासा येथे तिच्या सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. वेळप्रसंगी तिला शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच कृषी सेवा दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आण, असे सांगून तिला घराबाहेर हाकलून दिले.

पूजा डुकरे हिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात आरोपी विलास विठ्ठल डुकरे, विठ्ठल शंकर डुकरे, विमल विठ्ठल डुकरे, किसन शंकर डुकरे, कलाबाई किसन डुकरे (सर्व रा. वरखेड, ता. नेवासा) तसेच मंगल गोरख गायकवाड (राहणार लोणी, ता. राहाता) या सहा जणांवर शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानदेव गर्जे हे करीत आहेत.

Back to top button