नगर : 12 हजार ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर | पुढारी

नगर : 12 हजार ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर

नगर : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राबविलेल्या अमृत पंधरवाडा अभियानात आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तब्बल 11 हजार 676 ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात आला. दरम्यान, या महोत्सवात मातृवंदना योजनेतही मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद ठरला आहे. जिल्हा परिषदेने दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान अमृत पंधरवाडा अभियान राबविण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी 60 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने 15 दिवस उत्कृष्ट नियोजन केले. त्यामुळे जिल्ह्यात या पंधरवाड्यात तब्बल 11 हजार 676 नागरिकांचे लसीकरण करण्यात यश आले आहे.
कोणत्या तालुक्यात किती लसीकरण!

कर्जत 434, श्रीगोंदा 668, राहुरी 359, अकोले 605, पाथर्डी 766, नेवासा 1297, शेवगाव 595, संगमनेर 740, कोपरगाव 661, श्रीरामपूर 378, नगर 1599, जामखेड 1471, राहाता 610, पारनेर 991, आणि महापालिका क्षेत्रात 502 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

झेडपीच्या सर्वच विभागांची उत्कृष्ट कामगिरी

सीईओ येरेकर, अतिरिक्त सीईओ लांगोरे यांच्या मार्गदर्शनात समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी आपल्या विभागामार्फत 7544 ऊसतोडणी कामगारांना ओळखपत्र दिले. महिला व बालकल्याणने उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी अंगणवाडीत विविध उपक्रम राबविले. कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांनी 570 पेक्षा जास्त गावांमध्ये हर घर जल योजनेचा शुभारंभ केला. कृषी अधिकारी शंकर किरणे यांनी महाडिबीटीमार्फत वैयक्तिक 428 लाभार्थ्यांचे कागदपत्रे पूर्ण करून घेतले, तसेच बांधावर खते अभियान राबविण्यात आले.

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी कोविडमध्ये एकल झालेल्या सव्वासात हजार विद्यार्थ्यांची, तर आरोग्य विभागाने 55 हजार एकल महिलांची नोंदणी केली. रोजगार हमी योजनेव्दारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा होजगे यांच्या पुढाकारातून 450 शाळांना जैविक कंपाउंड करण्यात आले. डॉ. कुमकर यांनी 51 पशू आरोग्य केंद्रांची तपासणी केली. पांडुरंग गायसमुद्रे यांनी लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून 45 बंधारे पूर्ण केली.

Back to top button