नगर : राज्यपालांच्या वक्तव्याचा जामखेडला निषेध | पुढारी

नगर : राज्यपालांच्या वक्तव्याचा जामखेडला निषेध

जामखेड, पुढारी वृतसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मंबई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात महाराष्ट्राचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना गुजराती आणि राजस्थानी लोकांनी जर मुंबईमधून बाहेर काढले, तर मुंबईमध्ये पैसा राहणार नाही, तसेच मुंबई ही आर्थिक राजधानीही राहणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. याच अनुषंगाने काल तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, संपूर्ण भारत देश संभाळण्यात मराठी माणसांचा मोठा वाटा आहे. मात्र, भाजपकडून इतिहास पुसण्याचे काम केले जात आहे. बहुजनांना झाकून ठेवण्याचे काम हे सरकार करीत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस देशाचा कणा आहे. मराठी माणसाचा अपमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करीत असतील, तर याचा निषेध आम्ही करतो.

या वेळी कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार, सुरेश भोसले, अमित जाधव, प्रा. राहुल आहेर, अमोल गिरमे, प्रकाश काळे, अवधूत पवार, प्रा. विकी घायतडक, कुंडल राळेभात, इस्माईल सय्यद, मोहन पवार, फिरोज बागवान, नरेंद्र जाधव, संतोष निगुडे, वैजीनाथ पोले, प्रकाश सदाफुले, गणेश चव्हाण उपस्थित होते.

Back to top button