नगर : साकत खुर्दला कुस्त्यांचा थरार | पुढारी

नगर : साकत खुर्दला कुस्त्यांचा थरार

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील साकत येथे नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी यात्रौसत्वाची नुकतीच सांगता झाली. येथील पीरसाहेब यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कसब दाखविले.यावेळी रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा व कुस्त्यांचा आखाडा झाला नव्हता. त्यामुळे या वर्षी गावकर्‍यांचा उत्साह अधिक होता. यावेळी रोख बक्षिसांचा वर्षाव उपस्थित मल्लांवर करण्यात आला. गावच्या लोकवर्गणीसह उपस्थित मान्यवरांनीही रोख बक्षिसे देत मल्लांचा उत्साह वाढविला. नगर तालुक्यासह जिल्ह्यातील नामवंत मल्लानी आखाड्यात हजेरी लावली. यामध्ये अनेक कुस्त्या रंगतदार झाल्या.

मल्लांचे डाव, प्रतिडाव, चपळाई, मल्लविद्येतील कसब पाहून टाळ्या व शिट्ट्यांच्या आवाजाने जल्लोष केला. 500 रुपयांपासून 31 हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी पोलिस पाटील दत्तात्रय चितळकर, भाऊसाहेब मुंगसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा दरेकर, प्रा. विठ्ठल वाघमोडे, झुंबर पवार, सुभाष पवार, सर्जेराव पवार, सूर्यभान निमसे, मोहन वाघमोडे, अशोक मुंगसे, बाबासाहेब धनगर, रावसाहेब चितळकर, शिवाजी शिंदे, माणिक शिंदे, चांगदेव शिंदे आदी उपस्थित होते.

समालोचन पाराजी चितळकर,अशोक शिंदे, रामदास चितळकर, यांनी केले. पंच म्हणून संजय वाघमोडे, पोपट चितळकर, अविनाश पवार, विशाल बोचरे यांनी काम पाहिले. यावेळी कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर साकत येथे कुस्त्यांचा आखाडा झाल्याने कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button