नगर : लॉटरी, बिंगोचा तपास पोलिस निरीक्षकांकडे | पुढारी

नगर : लॉटरी, बिंगोचा तपास पोलिस निरीक्षकांकडे

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या लॉटरी व बिंगो जुगार अड्ड्यांवरील कारवाई प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतप शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने चार दिवसांपूर्वी ही कारवाई केली होती.

या प्रकरणी 16 जणांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. वाडिया पार्कसमोरील झेरॉक्स लाईनच्या गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या लॉटरी व बिंगो जुगारावर नाशिक पथकाने सोमवारी रात्री छापेमारी करत कारवाई केली होती.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 16 जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 चे कलम 4 व 5 सह लॉटरी अधिनियम 1998 चे कलम 7 (3), 9 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आता वाढीव माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) लावण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ज्ञानेश्वर वसंतराव तनपुरे, संतोष गुलाबचंद गोयल, नीलेश कृष्णा लोखंडे, आनंद लोढा, पंडीत पोकळे, शाम बालु आडागळे, विजय लक्ष्मण शिंदे, विकास दिलीप भिंगारदिवे, यासीन रज्जाक शेख, अशोक दामोदर कावळे, रामभाऊ सदाशिव घुले, प्रविण अनिल टेकाळे, बाबा महेबुब शेख, प्रकाश बबन गायकवाड, राकेश बालराज गुंंडू व महेंद्र माखिजा यांचा समावेश आहे.

Back to top button