कर्जत तालुक्यातील होलेवाडी, नवलेवस्ती येथे ढगफुटी ; वीज पडून एक मेंढी ठार | पुढारी

कर्जत तालुक्यातील होलेवाडी, नवलेवस्ती येथे ढगफुटी ; वीज पडून एक मेंढी ठार

राशीन: पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन, चिलवडी, होलेवाडी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. चिलवडी नजीकच्या नवलेवस्ती येथील पांडुरंग हरी शिंदे यांची मेंढी वीज अंगावर पडून दगावली आहे. तसेच चिलवडी परिसरातील होलेवाडी व नवलेवस्ती येथे ढगफुटी झाली असून बेलोरा ओढ्यास प्रथमच पहिल्याच पावसात पूर आला आहे .

दुपारी अडीच वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास सुरु असलेल्या पावसाने चिलवडी भागातील बंधारे भरून वाहू लागले आहेत. तसेच नवीन बंधारे झाले होते . त्याचे नुस्कान झाले आहे . राशीन परिसरासह येसवडी , बारडगाव , पिंपळवाडी सह इतर भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Back to top button