नगर : ज्येष्ठाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

नगर : ज्येष्ठाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर – औरंगाबाद रोडवरील पोखर्डी शिवारात एका ५५ वर्षीय व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली. दत्तात्रय हरिभाऊ पोहळे (वय ५५, मूळ रा. खरवंडी ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, अहमदनगर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

पोखर्डी (ता. नगर) शिवारातील आकाश हॉटेलच्या समोर गणपती मंदिराशेजारी लिंबाच्या झाडाला दत्तात्रय पोहळे यांनी गळफास घेतला. बुधवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. दत्तात्रय यांना शिवम दत्तात्रय पोहळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दत्तात्रय हे उपचारापुर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोहळे यांनी कोणत्या कारणातून गळफास घेतला याचा तपास पोलीस करत आहेत.

Back to top button