नगर : पर्यावरण संवर्धनासाठी प्रारंभ करा : दुर्गाताई तांबे | पुढारी

नगर : पर्यावरण संवर्धनासाठी प्रारंभ करा : दुर्गाताई तांबे

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा

पृथ्वीचे वाढलेले तापमान, कमी झालेला पाऊस, धोक्यात आलेले आरोग्य यांसह ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून व घरापासूनच प्लॅस्टिक बंदी, स्वच्छता, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाला सुरुवात करावी, असे आवाहन जयहिंद महिला मंचच्या अध्यक्षा व दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले.

Chittagong Fire : कंटेनर डेपोला भीषण आग, 37 कामगारांचा होरपळून मृत्यू

संगमनेर खुर्द येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, सागर माळी, हर्षल पारेकर, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक बाळासाहेब उंबरकर, प्रा. बाबा खरात, रोहिणी गुंजाळ, सरपंच गणेश शिंदे, सिनेअभिनेत्री पुजा काळे, अ‍ॅड. बी. आर. गांडोळे, सुभाष गुंजाळ, रमेश सुपेकर, गुलाब शेख, शुभम शिंदे, शशिकला गुंजाळ यांसह आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, वाढलेले दुष्काळ, कमी झालेला पाऊस, ग्लोबल वार्मिंगची समस्या यामुळे मागील दोन वर्षात कोरोनाचे भयानक संकट अनुभवले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी पर्यावरण रक्षण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने स्वतः व स्वतःच्या घरापासून पर्यावरण रक्षणाच्या कामाला सुरुवात करावी.

उत्तर भारताचा पारा पुन्हा वाढला, दिल्लीचे तापमान ४७ अंश सेल्सिअस

प्रत्येकाने प्लास्टिक वापर बंद करा. सार्वजनिक स्वच्छता राखा. वृक्षांचे रोपण व संगोपन करा. आपल्या घराच्या आजूबाजूला परसबागेत झाडांचे रोपण करून त्याचे संवर्धन करा. प्रा. बाबा खरात म्हणाले की, मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे व दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा वृक्षारोपण करणारा तालुका म्हणून राज्यात ओळखला जात आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात सर्वांनी अधिकाधिक वृक्षारोपण करा.

iifa award 2022 : एरिका फर्नाडिसच्या पिंक रंगाच्या ड्रेसवर चाहते फिदा

सिनेअभिनेत्री पूजा काळे, अ‍ॅड. बी. आर. गांडोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सागर माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाबा खरात यांनी केले. तर हर्षल पारेकर यांनी आभार मानले. पुढील पिढ्यांसाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियान सुरू केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही वृक्षारोपणाची लोक चळवळ खर्‍या अर्थाने महाराष्ट्राला दिशादर्शक ठरली आहे.

Back to top button