उत्तर भारताचा पारा पुन्हा वाढला, दिल्लीचे तापमान ४७ अंश सेल्सिअस | पुढारी

उत्तर भारताचा पारा पुन्हा वाढला, दिल्लीचे तापमान ४७ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा

पुढील काही दिवसांत केरळसह दक्षिण भारतात मान्सूनचा पाऊस धडकण्याचा अंदाज वर्तवला जात असताना उत्तर भारतातील पारा मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. गरम हवेमुळे लोकांना दिवसा घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच जून महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदविले गेले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दिल्लीतील मुंगेशपूरमध्ये४७.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातील राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश, दक्षिण हरियाणा, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसेच महाराष्ट्रातील विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्यता ‘स्कायमेट’ वेधशाळेने व्यक्त केली आहे. विदर्भ, झारखंड, ओडिशाचा काही भाग व छत्तीसगड या राज्यांमध्ये ६ जूनपर्यंत उष्ण हवा राहू शकते. दक्षिण उत्तर प्रदेश व उत्तर मध्य प्रदेशात ८ जूनपर्यंत अशी स्थिती राहू शकते, असेही हवामान खात्याचे म्‍हटलं आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button